आजच्या निर्णयामुळे सर्वांची तोंड बंद झाली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून,फटाके फोडून आजच्या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ पक्ष आहे.तसेच शरद पवार गटाकडून सादर करण्यात आलेल्या तीन ही याचिका महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना पात्र ठरविले.या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी नारायण पेठेतील पक्ष कार्यालयाबाहेर पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले की,महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेबांनी जो निर्णय दिला आहे.आम्ही त्या निर्णयाचे स्वागत करीत असून अजितदादासोबत जे खासदार, आमदार, आजी माजी पदाधिकारी सोबत राहिले आहेत.त्या सर्वांचा मी आभारी आहे.राज्यातील प्रत्येक कार्यकर्ता यापुढील काळात देखील दादा सोबत असणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, आगामी काळ हा निवडणुकीचा असून त्यामुळे काहीचा पक्ष चिन्ह मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.वटवृक्ष चिन्ह मिळविण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र हे चिन्ह विश्व हिंदू परिषदेचे कित्येक वर्षापासुन आहे.ते पण मिळण्याची शक्यता फार कमी आहे.त्यामुळे आता त्यांना कपबशी चिन्ह द्या,त्याचबरोबर मागील आठ ते दहा दिवसात काही लोक सतत विधान करीत होती. त्यामुळे आजच्या निर्णयामुळे सर्वांची तोंड बंद झाली आहेत.अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्यांनी टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, महेश शिंदे, बाळासाहेब बोडके, कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, पूजा झोळे, शुभम माताळे, अर्चना चंदनशिवे, वनिता जगताप, शांतीलाल मिसाळ, अभिषेक बोके,सतीश म्हस्के, अजय दराडे, नरेश जाधव, नुर्जहा शेख, राहुल तांबे, रामदास गाडे, लावण्या शिंदे, विनोद काळोखे, प्रशांत कडू, अच्युत लांडगे, चेतन मोरे, अतुल जाधव, गुलशन शेख, योगेश वराडे, बाबू शेख, सनी किरवे, गजानन लोंढे, सुमित केदासे, सत्यम पासलकर, श्वेता मिस्त्री, संतोष बेंद्रे आदी उपस्थित होते.