आघाडीत चर्चा कसबा पॅटर्नची पण..काँग्रेसचा !अंतर्गतवाद पुन्हा चव्हाट्यावर
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळली आहे. धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये असणाऱ्या इतर इच्छुकांमध्ये नाराजीची लाट पसरली आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी खुळेपने आपण नाराज असल्याचं जाहीर करत काँग्रेसभवनमध्ये मुक आंदोलन केलं. तर अद्यापही शहरातील प्रमुख नेत्यांमध्ये असणारा अंतर्गत कलह थंडावताना दिसत नाही. आघाडीत चर्चा कसबा पॅटर्नची पण..काँग्रेसचा !अंतर्गतवाद पुन्हा चव्हाट्यावर
काल धंगेकर यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी केसरीवाड्यामध्ये मेळावा पार पडली. यावेळी देखील हा वाद कायम राहिल्याने धंगेकर यांच्यासाठी डोकेदुखी वाढताना दिसत आहे.
केसरी वाड्यामध्ये आयोजित मेळाव्याला काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, जेष्ठ नेते अंकुश काकडे यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र एका बाजूला विजय मिळवण्याच्या आरोळ्या ठोकल्या जात असताना दुसरीकडे उपस्थित काँग्रेस नेत्यांमध्ये मात्र नवा वाद दिसून आला.
महाविकास आघाडीचा मेळावा सुरू असताना रोहित टिळक हजर झाले, मात्र ते सभागृहात आल्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने चर्चेचा विषय बनला आहे. धंगेकरांची उमेदवारी जाहीर होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य कायम असल्याचं यावरून दिसून आलं. त्यामुळे कसबा पॅटर्नची चर्चा सुरू असली तरी नाराजीचा हा पॅटर्न मात्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढवणार आहे.
आघाडीत चर्चा कसबा पॅटर्नची पण..काँग्रेसचा !अंतर्गतवाद पुन्हा चव्हाट्यावर