18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

आकाश बायजूजतर्फे सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार

Share Post

आकाश बायजूज विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या  आघाडीच्या संस्थेने आपल्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या एएनटीएचई-२०२३ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा) च्या १४व्या आवृत्तीची घोषणा केली. ही वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार मिळवण्याची संधी देते. वैद्यकशास्त्र किंवा अभियांत्रिकीमधील उज्ज्वल स्वप्ने साकारण्यासाठी तरुणांना सक्षम बनवून एएनटीएचई-२०२३ हा यशाचा मार्ग खुला असल्याचे वचन देते.

ही शिष्यवृत्ती मिळवणारे आकाश संस्थेमध्ये नावनोंदणी करू शकतात आणि नीट, जेईई,  राज्यपातळीवरील सीईटी, शाळा किंवा बोर्ड परीक्षा, राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शोध (एनटीएसई)  आणि ऑलिम्पियाड्ससारख्या अशा विविध शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवू शकतात. या वर्षी विद्यार्थ्यांसाठी यात आणखी एक मौल्यवान भर घालण्यात आली आहे, ती म्हणजे विविध इयत्तांमधील १०० विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान मोहिमेसाठी पाच दिवसांची सशुल्क सहल जिंकण्याची संधी आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, एएनटीएचई परीक्षेने उल्लेखनीय कामगिरी केली असून, आकाश बायजूजचे अनेक विद्यार्थी नीट (यूजी) आणि जेईई (अॅडव्हान्सड्) सारख्या परीक्षांमध्ये अव्वल ठरले आहेत. एएनटीएचई परीक्षेपासून आकाशमधून शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करणारे कौस्तव बौरी (ऑल इंडिया रॅंकिंग -३), ध्रुव अडवाणी (ऑल इंडिया रॅंकिंग-५), आणि सूर्य सिद्धार्थ एन (ऑल इंडिया रॅंकिंग-६) यांच्यासह अनेक विद्यार्थी नीट (यूजी) आणि जेईई (अॅडव्हान्सड्) सारख्या परीक्षांमध्ये अव्वल ठरले आहेत. त्याचप्रमाणे आदित्य नीरजे (ऑल इंडिया रॅंकिंग -२७) आणि आकाश गुप्ता (ऑल इंडिया रॅंकिंग -२८) यांनीही   जेईई (अॅडव्हान्सड्) २०२३ मध्ये चमकदार यश मिळवले आहे.