29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

आंतरराष्ट्रीय योग दिन रहिमतपूर मध्ये उत्साहात साजरा…

Share Post

वसुधैव कुटुंबकम् करीता योग..

‘हर घर -अंगण योग’ या थीमनुसार रहिमतपूर मध्ये नववा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा
करण्यात आला. रहिमतपूर नगरपरिषद, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जागतिक पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे, हिंदुस्थान फिड्सचे श्री नितीन माने, चौंडेश्वरी संस्थेचे अरुण माने यांच्या
मार्गदर्शनाखाली योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

शैक्षणिक संस्थांच्या मुलांच्या वतीने शहरभर योग दिंडी काढण्यात आली. घोषवाक्यांच्या
माध्यमातून गावामध्ये योग विषयक प्रचार प्रसार करण्यात आला. योग दिंडीने सर्व मुले ग्रामस्थ
डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी रहिमतपूर स्टेडियममध्ये एकत्र जमले. या ठिकाणी सर्वांनी
‘योगशिक्षक सर्जेराव कातिवले यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रोटोकॉलनुसार
योग साधना केली. रहिमतपूरला पहिले योग ग्राम बनवण्याचा संकल्प करून योग साधना संपन्न
झाली. यानंतर मुलांना खाऊवाटप केला.

योग म्हणजे जोडणे, विभिन्न मनांना एकत्र जोडणे. आजचा २१ जूनच्या योग दिन एक दिलाने एकत्रित
येऊन उत्साहाने साजरा करून रहिमतपूरकरांनी याचा प्रत्यक्ष दाखला दिला.

या योग दिना च्या कार्यक्रमासाठी सर्व संस्थांचे विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ डॉक्टर असोसिएशनचे
पदाधिकारी पुनरुत्थान विद्यापीठ चे रामचंद्र भोसले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रतिनिधी, तसेच
ग्रामस्थ उपस्थित होते. या योग दिनाच्या आयोजनात रहिमतपूर नगर परिषदेचे घाटगे, राणे तसेच
सर्व शैक्षणिक संस्थांचे शिक्षक श्रीराम फाउंडेशनचे योग वॉलेंटियर्स आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम
घेतले.