18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

अमोल कोल्हे यांना मतदार संघात न फिरल्याचा फटका बसणार?

अमोल कोल्हे यांना मतदार संघात न फिरल्याचा फटका बसणार?

अमोल कोल्हे यांना मतदार संघात न फिरल्याचा फटका बसणार?

अमोल कोल्हे यांना मतदार संघात न फिरल्याचा फटका बसणार?
Share Post

अमोल कोल्हे यांना मतदार संघात न फिरल्याचा फटका बसणार?पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक हाय प्रोफाईल लढतीपैकी एक लढत हि शिरूर लोकसभा मतदार संघात होत आहे. यंदा देखील अभिनेते आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे (शरद पवार गट ) यांच्या समोर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांचे आव्हान असणार आहे. प्रचाराची जोरदार सुरुवात दोन्ही बाजूंनी सुरु आहे मात्र मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका बसणार असल्याची चर्चा सध्या नागरिक करत आहेत.अमोल कोल्हे यांना मतदार संघात न फिरल्याचा फटका बसणार?

शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ ला डॉ. कोल्हे यांना त्यांनी केलेला मालिकांमधील ऐतिहासिक भूमिकेचा मोठा फायदा झाला होता, ते निवडून देखील आले मात्र त्यानंतर जनतेशी त्यांचा संपर्क म्हणावा तितका राहिला नाही. जनतेने देखील मोठ्या अपेक्षेने त्यांना भरभरून मतदान केले मात्र त्याबदल्यात त्या मायबाप जनतेला भरघोस आणि ठोस असे काहीही मिळाले नसल्याचे चित्र सध्या आहे. मागील वेळी अनुकूल असणारी परिस्थिती आता तशी राहिलेली नाही. मतदारसंघात ते फारसे न फिरल्यामुळे त्याचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये जास्त बसण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्य नागरिकांपासून त्यांचे पदाधिकारी आणि नेत्यांना देखील कोल्हे भेटत नसल्यामुळे त्यांच्यावर असलेली नाराजी आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर प्रथम अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते, त्यांना पाठिंबा देत मंत्रिमंडळाच्या शपथविधीलादेखील उपस्थित होते. नंतर त्यांनी ‘यू’ टर्न घेत संधी साधण्यासाठी शरद पवारांसोबत राहिले अशी देखील कुजबुज आहे.

निवडून दिल्यानंतर मतदारांना उपलब्ध न झालेले खासदार अगदी निवडणुकीच्या तोंडावर काही महिने मतदारसंघात येतात शेतकऱ्यांचे प्रश्न घेतात लोकसभेत भाषणबाजी करतात आणि मला शेतकऱ्यांची फार काळजी आहे असे भासवण्याचा प्रयत्न करतात,अशी चर्चा मतदारसंघात आहे.या उलट पराभवाने खचून न जाता शिवाजीराव आढळराव हे सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिले आता हाच मुद्दा आढळराव पाटील यांच्यासाठी फायद्याचा ठरणार का हे निकालातून स्पष्ट होईल.

अमोल कोल्हे यांना मतदार संघात न फिरल्याचा फटका बसणार?