अमेरिकेतील मॉर्मन पंथाचे संस्थापक जोसेफ स्मिथ ज्यू.यांच्या पुतळ्याचे अनावरण
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट,डिझाइन अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या घुमटामध्ये म्हणजेच तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर जगद्गुरू-तुकाराम विश्व शांती सभागृह, विश्वराजबाग, पुणे येथे २२ नोव्हेंबर रोजी स. १०.३० वा. मॉर्मन पंथाचे संस्थापक व विचारवंत जोसफ स्मिथ ज्यू. यांच्या पुतळ्याचे अनवारण करण्यात येईल. याच निमत्ताने त्या दिवशी एक दिवसीय वर्ल्ड इंटरफेथ हॉर्मनी कॉेन्फरन्स २०२२ या आंतरधर्मिय समन्वय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी पत्रकार परिषदेते दिली.
या वैशिष्टपूर्ण समारंभासाठी अमेरिकेहून मॉर्मन पंथातील काही प्रमुख नेते विशेष करून उपस्थित राहाणर आहेत. या मध्ये एल्डर डी.टॉड क्रिस्टोफरसन, युएसए येथील स्पन कन्स्ट्रक्शन अँड इंजीनियरिंग या उद्योग समूहाचे अध्यक्ष किंग हुसेन, ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष कविंन वर्धीन, रिचर्ड नेल्सन, रोनाल्ड गुणेल, डॉ. अशोक जोशी इ. समावेश आहे.
समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लडाख येथील महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरचे संस्थापक व्हेनेरेबल भिक्कू संघ सेना हे उपस्थित राहणार असून जगविख्यात संगणक तज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर व बहाई अॅकॅडमीचे डॉ. लेसन आझादी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

जगभरात मॉर्मन पंथाचे सुमारे दिड कोटीच्या वरती अनुयायी आहेत. या पंथाची स्थापना जोसेफ स्मिथ जूनियर यांनी न्यूयॉर्क येथे २३ एप्रिल १८२० रोजी केली. जोसेफ स्मिथ यांनी आपल्या ३९ वर्षाच्या अल्प आयुष्यात मॉर्मन पंथाची स्थापना करून एका अतिशय आदर्शवत अशा जीवनशैलीचा पुरस्कार केला. वयाच्या १५वर्षी त्यांना प्रत्यक्ष येशू ख्रिस्त व ईश्वर यांनी दृष्टांत देऊन त्यांच्या जीवनाला पुढील दिशा दिली. त्यांनी लिहिलेले द बुक ऑफ मॉर्मन हा ग्रंथ पवित्र बायबल इतकाच वंदनीय आहे असे मॉर्मन पंथीय मानतात. सुरूवातीला अतिशय प्रखर विरोध करून सुद्धा आज मॉर्मन पंथाला जगभरात विशेष मान्यता प्राप्त झाली आहे.
या पत्रकार परिषदेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड रॉन ब्रुनेल, रिचर्ड नेल्सन, डॉ. अशोक जोशी, डॉ. प्रियंकर उपाध्याय, व एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे हे उपस्थित होते.