‘अपत्यहीन जोडप्यांना ‘आयव्हीएफ’मुळे पालकत्वाची अनुभूती’
वाढता ताणतणाव, बदललेली जीवनशैली, स्थूलपणा, पीसीओडीसारखे आजार, उशिरा लग्न होण्यासह शिक्षणाचा अभाव यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी आयव्हीएफ सारखे तंत्रज्ञान मातृत्वासाठी वरदान ठरत असून, अपत्यहीन जोडप्यांना पालकत्वाची अनुभूती देणे शक्य झाले आहे. सहज मातृत्वासाठी भावी पिढीने योग्य ती काळजी घेण्याची गरज असून, त्यासाठी बेनिकेअर मदर अँड चाईल्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल जागृती करत आहे. गेल्या दोन वर्षात बेनिकेअर हॉस्पिटलने २५०० पेक्षा अधिक जोडप्यांना पालकत्वाचा आनंद दिला आहे,” अशी माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग, प्रसूती व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे यांनी दिली.
बाणेर येथील बेनिकेअर मदर अँड चाईल्ड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने जागतिक आयव्हीएफ दिवसाच्या निमित्ताने आयोजित वार्तालापात डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे बोलत होत्या. प्रसंगी बेनिकेअर हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोग, प्रसूती व एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉ. जयदीप पाळवदे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरदीप पाळवदे, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद बालटे, डॉ. सागर राठी, ऍडमिन व बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टन्ट डॉ. राजेश देशपांडे, दंतवैद्यक डॉ. प्रियांका पाळवदे, आदी उपस्थित होते. यावेळी हॉस्पिटलच्या वतीने आयव्हीएफ बद्दल सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशन यासाठी चोवीस तास आयव्हीएफ विशेष हेल्पलाईन ९०३९०३७९०० सुरु करण्यात आली.
डॉ. चारुशीला बोरोले-पाळवदे म्हणाल्या, “मेट्रो-स्मार्ट सिटी मुळे जगण्याचा स्तर उंचावला आहे. मात्र, वंध्यत्वाची समस्या वाढत आहे. उशिरा लग्न होण्यासह लग्न झाल्यावरही मूल होऊ न देणे किंवा वेळ घेणे, त्यातून होणारे शारीरिक बदल, येणारे ताण यामुळे मातृत्वाच्या प्रक्रियेत अनेक अडचणी येतात. पुरुषांमध्येही प्रदूषण, फास्ट व जंक फूड, नशा, व्यसने यासह पुरेशा झोपेचा अभाव आणि त्यातून येणारा ताण यामुळे शुक्राणू निष्क्रिय होतात. अशावेळी योग्य काळजी आणि योग्य वेळी मातृत्वाची संधी घेणे गरजेचे आहे. लग्नाआधी यासंदर्भातील तपासण्या करायला हव्यात. जेणेकरून नंतर नातेसंबंधात तेढ निर्माण होणार नाही.”
