NEWS

अनिकेत जावळकर यांची शिवसेना (शिंदे गटा)च्या युवा सेना प.महाराष्ट्र निरीक्षकपदी निवड

Share Post

सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत कर्वेनगर येथील सक्रिय कार्यकर्ता अनिकेत जावळकर यांची शिवसेनेच्या (शिंदे गट), युवा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील एक नियुक्ती पत्र शिंदे गटाचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी अनिकेत यांना दिले. शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून जावळकर हे राज्यभरात गडकिल्ले संवर्धनाचे कार्य करीत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांसह पक्ष आणि संघटन वाढीसाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनिकेत जावळकर हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट), युवा सेनेकडून संपूर्ण राज्यभरात निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प. महाराष्ट्र विभागात पक्षाला बळ देण्यासाठी अनिकेत यांच्या खांद्यावर ही जवाबदारी देण्यात आली आहे. तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युवा सेनेकडून पदाधिकार्‍यांना मोठी जवाबदारी दिली आहे. शिवभक्त अनिकेत जावळकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कर्वेनगर क्षेत्रात आपला जनसंपर्क दांडगा केला आहे. क्षेत्रातील नागरिकांच्या सेवेसाठी ते २४ तास उपलब्ध असतात. त्याच प्रमाणे त्यांनी या क्षेत्रात वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिर, वृद्धांना मदत, क्षेत्रात विविध समाजपयोगी कार्यक्रम सतत राबवित असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या युवासेनेसाठी निरीक्षक पदी त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्ती बद्दल राजकीय व सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *