NEWS

अझरबैजान ठरला बहुप्रतिक्षित अशा ९ व्या आयआयएचएम यंग शेफ ऑलिम्पियाडचा विजेता

Share Post

जगातील सर्वात मोठया पाककलेचे ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे कोलकत्ता येथील वेट-ओ-वाइल्ड, निको पार्क कॉम्प्लेक्स, सॉल्ट लेक येथे एका नेत्रदीपक समारोप समारंभासह आणि पुरस्कार सोहळ्याबरोबर समाप्त झाला. हि पाककला स्पर्धा मागील अधवडभर भारतातील सहा शहरात झाले होते आणि त्यामध्ये जगभरातील ५३ देशांतील यंग शेफ्सने आपल्या पाककला आणि पाक कौशल्यांचे प्रदर्शन केले होते. अझरबैजानचा एमिल झेनालझेड याला सुवर्ण चषक आणि ५००० डॉलर्स असे सर्वोच्च पारितोषिक मिळाले. थायलंडच्या पातीफोन लेर्तसुराकीत्ती याला रौप्य चषक आणि ३००० डॉलर्स आणि भारताच्या नौरीन शेख याला ब्रॉन्झ चषक आणि २००० डॉलर्सचे पारितोषिक मिळाले. कोविड-१९ महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर, यंग शेफ ऑलिंपियाड २०२३ भारताच्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोलकातामध्ये प्रत्यक्षात भरवण्यात आली. जगातील सर्वात्तम यंग शेफ हा बहुमान मिळवण्यासाठी, ग्रँड फिनालेमध्ये जगातील प्रतिभावान शेफचा एकमेकांशी सामना होता. वायसीओ २०२३ मध्ये आतिथ्य आणि पर्यटन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध आणि नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. अझरबैजान, इंग्लंड, फ्रान्स, भारत, मलेशिया, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सिंगापूर, थायलंड आणि अमेरिका हे वायसीओ २०२३ मधील अंतिम स्पर्धक होते: यांच्यातील स्पर्धा आयआयएचएम ग्लोबल कॅंपस, सेक्टर ५, सॉल्ट लेक, कोलकाता येथे पार पडली. वायसीओ ग्लोबल काउन्सिलचे अध्यक्ष, इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी काउन्सिल, लंडनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इंडिस्मार्ट ग्रुपचे संस्थापक व मुख्य मेंटर डॉ. सुबर्नो बोस यांनी सांगितलं, “अतिशय निर्धाराने आयोजित केलेल्या यंग शेफ ऑलिंपियाड हे फक्त जिंकणं किंवा हरण्यापुरतं मर्यादित नाही. यात मैत्री, सौहार्द, बंध आणि आयुष्यभरासाठी मित्र कमावणे याही गोष्टी आहेत. ही एक स्पर्धा नक्कीच आहे ज्यामध्ये जगाचा सामना जगाबरोबर होतो. या ठिकाणी आयुष्यभरासाठी आठवणी निर्माण होतात.” समारोपाच्या तारांकित सोहळ्यामध्ये विद्यार्थी, मेंटर्स, परीक्षक आणि सर्व संबंधित लोक यांचा सळसळता उत्साह प्रतीत होत होता ज्यामुळे वायसीओ २०२३ ला प्रचंड यश मिळाले. भव्य समारोप सोहळ्यात जगभरातील ५३ देशांतील यंग शेफ्स आणि त्यांचे मेंटर्स यांना मंचावर बोलावून प्रेक्षकांना त्यांची ओळख करून देण्यात आली. जगभरातील यांग शेफ्सची ही सर्वांत मोठी परिषद होती. समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान पाककला क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे वायसीओसंबंधी अनुभव सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सूक्ष्म तपशील आणि शाश्वत आतिथ्य याचे महत्व सांगितले. पन्नासहुन अधिक देशांतून आलेल्या सहभागींसाठी हा अतिशय खिळवून ठेवणारा अनुभव होता. बर्मिंगहॅम विश्वविद्यालयाचे कुलपती असणाऱ्या लॉर्ड करण बिलिमोरिया यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे यंग शेफ्सचे अभिनंदन केले तर एमबीई असणारे वायसीओचे ज्युरी प्रोफेसर डेव्हिड फॉस्केट यांनी समारंभाची शोभा वाढवली. यंग शेफ ऑलिंपियाडचे मुख्य मेंटर असणारे शेफ पद्मश्री संजीव कपूर हेही या सोहळ्याला उपस्थित होते. आदरातिथ्य क्ष्रेत्रातील नामवंत व यंग शेफ ऑलिंपियाडचे सर्वेसर्वा डॉ. सुबर्नो बोस यांचेही दूरदर्शी विचार सहभागी लोकांना ऐकण्याची संधी यावेळी उपस्थितांना प्राप्त झाली. त्यांच्या धाडसी शैलीमुळेच जगातील सर्वांत मोठे पाककला ऑलिंपियाड प्रत्यक्षात येऊ शकले. डॉ. बोस यांनी ५३ देशांना एकहाती एका छताखाली आणले आणि ३३ लाख सदस्य असणाऱ्या आयआयएचएमच्या चॅनलद्वारे हा सोहळा जगभरात दाखवण्यात आला. अझरबैजानचे राजदूत डॉ. अश्रफ शिखालीयेव्ह समारोप कार्यक्रमासाठी दिल्लीहून आले होते. अझरबैजानचा यंग शेफ विजेता झाल्यामुळे त्यांना विशेष आनंद झाला आणि त्याला पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. वायसीओ हा एकमात्र कार्यक्रम आहे ज्यामध्ये जगभरातील अनेक देश एकाच मंचावर एकत्र येतात आणि वायसीओ विजेत्यांच्या प्रतिष्ठित किताबासाठी लढतात. आणखी एका लक्षणीय संस्मरणीय अश्या वायसीओ सोहळ्यासाठी यजमान आयआयएचएमने आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *