अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे आयोजन
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा १४ ते १८ जुलै २०२३ दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे. त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीतकार कौशल इनामदार, उद्योजक सौरभ गाडगीळ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सारिका निंबाळकर, अबोली सुपेकर आदी उपस्थित होते.
निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ, उद्योग भूषण पुरस्कार युवराज ढमाले कॉर्प चे संचालक युवराज ढमाले, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार, धार्मिक भूषण पुरस्कार श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगाव चे प्रमुख विश्वस्त प्रकाश देवळे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,फळांची करंडी, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दिनांक १८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होणा-या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी महिला बचतगट स्पर्धा पारितोषिक वितरण शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री सुप्रिया पाठारे, ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या हस्ते होईल. महिला बचत गट स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
