29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

अंध कलाकारांच्या गायन वादना ने रसिक मंत्रमुग्ध

Share Post

पुण्यातील धायरीच्या प्रथम महिला सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या माजी अध्यक्षा सुरेखाताई दमिष्टे यांच्या एकसष्टी निमित्त खेळ पैठणीच्या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नुकत्याच झालेल्या जागतिक अंध दिना निमित्याने पुण्यातील धायरीच्या प्रथम महिला सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या माजी अध्यक्षा सुरेखा ताई दमिष्टे(पोकळे) यांच्या तर्फे दळवीवाडी येथील अंध शाळेत फळे वाटप करण्यात आली. तसेच अंध मुलांच्या वसतीगृहाच्या मदती साठी संगीत रजनी चे आयोजन करण्यात आले होते.विविध वाद्ये वाजवणाऱ्या आणि गाणाऱ्या अंध कलाकारांनी सादर केलेल्या बहारदार गायन व वादनाने रसिक श्रोते भारावून गेले. त्यांनी हिंदी व मराठीतील अनेक लोकप्रिय गाणी सादर केली. चंद्रा…. गाण्यास श्रोत्यांची दाद मिळाली. या गाण्यावर अनेकांनी ठेका धरला. धायरी येथील सूर्यगंगा सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

जागतिक अंध दिन आणि सुरेखा ताई दमिष्टे (पोकळे) यांच्या एकसष्टीपूर्ती अभिष्टचिंतन सोहळा अशा एकत्रित कार्यक्रमात महिलांसाठी विजय वाघचौरे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ घेण्यात आला यावेळी असंख्य महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धेत भाग घेतला या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून योगिता गोसावी यांनी काम पहिले यावेळी अभिनेत्री माधवी मोरे उपस्थित होत्या, सुरेश माने, रुपेश व निलेश दमिष्टे मित्र परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कलाकार आणि निवेदक विजय देविदास वाघचौरे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी पी डी सी सी बँकेचे संचालक विकासनाना दांगट ,काकासाहेब चव्हाण, प्रसन्नदादा जगताप, राजकुमार लोढा, सुनिलजी शिंदे, महेंद्र भोसले, सचिन बराटे, आबासाहेब जगताप, सचिन बेनकर प्रविण शिंदे, कुणाल पोकळे, स्वाती पोकळे, डांगेताई, तृप्ती पोकळे, राजेश्वरी पाटील, विजया देडगे, दशरथ मनेरे आशा मते, उज्वला टिळेकर,शारदा मते असे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.